** अण्णांचे डेंजर उपोषण **
एके दिवशी सकाळी शेजारचा बाब्या जोरात पळत आला.धापा टाकून होताच मी त्याला कारण विचारले.
बाब्या एकदम अंगात आल्यासारखे करून म्हणाला ,
' आता देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार,प्रगती होणार,
महागाई कमी होणार, युवकांना नोकऱ्या मिळणार,
शेतकरी ,कष्टकरी सुखी होणार,भ्रष्टाचार बंद होणार .....'
एका दमात बोलला तो मात्र दम मला लागला .
त्याला मध्येच थांबवून मी विचारले
तुला हे अंतर्द्यान कुठून झाले ??
बाब्या छाती ताईट करून म्हणाला ' लेका असतोस कुठे ?'
अरे अण्णा आता आमरण उपोषणाला बसले दिल्लीला .
मी म्हणालो ' त्यात नवीन ते काय भाऊ ?
अण्णा आणि उपोषण हे तर जुनेच समीकरण आहे '
बाब्या उत्तरला ' पण आताचे उपोषण साधे सुधे उपोषण नाही,
लई डेंजर हाये ह्या टायमाला म्हणे .डायरेक्त संसदेतच घुसले अण्णा '.
म्हणजे अण्णांनी नेमके काय केले ह्या विचारांनी मी घाबरलो .
बाब्या माझी अवस्था पाहून म्हणाला ' डरनेका नाही दोस्त .
अण्णाने जनलोकपाल बील बनाया है बोले .
आता अण्णा कोनालाबी पदावरून हटवू शकतो .
खुद्द ,पी.एम. ला बी ...... ' आणि बाब्या जोरात विकट हसला .
मी कोणत्या काळात राहतो हेच मला समजेना .
आणि बरोबरच बाब्याच्या अगाध ज्ञानाची असूया वाटू लागली मला.
मी तडक घर गाठले आणि पटकन टी.व्ही.चालू केला .
मला तत्काळ ब्रेकिंग निव्ज मिळाली.
पवारसाहेबांनी आपला राजीनामा दिला आणि
दोनच दिवसांत अण्णांनी लिम्बुरसाचा पेला रिता केला.
आणि पुढच्या चारच दिवसात म्हणे अण्णांच्या भाच्याने
राष्ट्रवादी पार्टीच्या पदाचा राजीनामा देवून परत कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला.
मी डोक्याला हात लावून अण्णांच्या डेंजर उपोषणाचा विचार करू लागलो.
असे उपोषण आणि बाब्याने सांगितलेला सारा देशाचा विकासाचा संबंध काय ?
अनालिसिस करत स्वतःचेच डोके वारंवार खाजवू लागलो .

No comments:
Post a Comment